शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: शनिवार, 30 जुलै 2022 (13:05 IST)

Import Export License Procedure: ऑनलाइन आयात-निर्यात नोंदणी कशी करावी?जाणून घ्या

Import Export License Procedure: डायरेक्टर जनलर ऑफ फॉरेन ट्रेड (Director General of Foreign Trade) इम्पोर्ट आणि एक्स्पोर्ट व्यवसाय सुरू करण्यासाठी IEC परवाना जारी करतात. केवळ आयात परवाना असलेल्या आयातदारांना परदेशातून भारतात माल आणण्याची परवानगी आहे. त्याचबरोबर ज्यांच्याकडे निर्यात परवाना आहे त्यांनाच DGFT च्या योजनेचा लाभ मिळतो.
 
आयात निर्यात परवाना कधी आवश्यक आहे ?
* जेव्हा आयातदारांना कस्टममधून शिपमेट क्लियर करून घ्यावा लागतो तेव्हा कस्टम अधिकारी आयात परवाना मागतात.
* जेव्हा आयातदार परदेशात पैसे पाठवतो तेव्हा बॅंकेकडून आयात परवाना मागितला जातो.
* जेव्हा निर्यातदारांना त्यांचा माल परदेशात पाठवायचा असतो तेव्हा कस्टम बंदरावर निर्यात परवाना दाखवणे बंधनकारक असते.
* जेव्हा निर्यातदारांना त्यांच्या खात्यात परकीय चलन मिळते तेव्हा बँकेकडून निर्यात परवाना मागितला जातो.
 
* आयात-निर्यात परवान्यासाठी ऑनलाइन नोंदणी कशी करावी ?
1- DGFT वेबसाइट https://www.dgft.gov.in/CP/ ला भेट द्या आणि ‘Services’ टॅबवर क्लिक करा
 
2-ड्रॉप-डाउन मेनूमधील 'IEC प्रोफाइल व्यवस्थापन' पर्यायावर क्लिक करा जे एक नवीन पृष्ठ उघडेल. पृष्ठाच्या तळाशी उजव्या बाजूला ‘Apply for IEC साठी अर्ज करा' बटण दाबा.
3 - स्क्रीनवर दिसणार्‍या पॉप-अप पेजमधील 'नोंदणी' पर्यायावर क्लिक करा. आवश्यक तपशील भरल्यानंतर 'Sent OTP' बटण दाबा.
4- OTP एंटर करा आणि 'नोंदणी करा' बटण दाबा
5 - ओटीपीची पडताळणी झाल्यानंतर, तुम्हाला तात्पुरता पासवर्ड मिळेल.
6- हा पासवर्ड वापरून, पुन्हा DGFT वेबसाइटवर जा आणि 'Apply for IEC' वर क्लिक करा.
7-अप्लिकेशन फॉर्म  (ANF 2A फॉरमॅट), आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, फी भरा आणि 'सबमिट आणि जनरेट आयईसी सर्टिफिकेट' बटणावर क्लिक करा.
8 - DGFT द्वारे IEC कोड जारी केला जाईल. या प्रमाणपत्राची प्रिंट आउट तुमच्याकडे ठेवा.
 
आयात निर्यात कोडसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे-
* अर्जदार, फर्म किंवा कंपनीच्या पॅन कार्डची प्रत
* अर्जदाराची मतदार ओळखपत्र, आधार किंवा पासपोर्टची प्रत
* अर्जदार, कंपनी किंवा फर्मच्या चालू बँक खात्याचा चेक रद्द केलेला
* ऑफिस कॅम्पसच्या वीज बिलाची किंवा भाडे कराराची प्रत
* सेल्फ एड्रेस असलेला लिफाफा जेणेकरून परवाना पोस्टाने पाठवता येईल.