बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (17:57 IST)

मतदार ओळख पत्र मोबाईलवर डाउनलोड करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

आता मतदार ओळखपत्र मोबाईलवरून डाउनलोड करणे झाले सोपे जाणून घ्या पद्धत 
आधारे कार्डा प्रमाणेच जर आपल्याकडे मतदार ओळखपत्र असल्यास बरीच सरकारी आणि गैर सरकारी कामे सहजपणे हाताळली जाते.मते टाकण्याशिवाय हे कार्ड बऱ्याच ठिकाणी वापरले जाते.परंतु अनेकदा मतदार ओळखपत्राची हार्डकॉपी नसल्याने अडचणींना सामोरी जावे लागते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी देशभरात इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रोरेल फोटो आयडी कार्डाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. आता आपण आपले डिजीटल मतदार ओळखपत्र निवडणूक  आयोगाच्या साईटवरून डाउनलोड करू शकता. चला जाणून घेऊ या की आपण मतदार ओळखपत्र कसे डाउनलोड करू शकता.   
 
ई-EPIC  ई-ईपीआयसी एक सुरक्षित पोर्टेबल दस्तऐवज स्वरूप (पीडीएफ)व्हर्जन आहे, जी मोबाईल वर किंवा कॉम्प्युटर वर सेल्फ प्रिंटेबल म्हणून डाउनलोड केले जाऊ शकते. एक मतदार आपल्या मोबाईलवर हे कार्ड स्टोअर करू शकतो  किंवा डीजी लॉकर वर पीडीएफच्या स्वरूपात अपलोड करू शकतो. इतकेच नव्हे तर हे प्रिंट करून आपल्या पाकिटात किंवा घरात देखील ठेऊ शकतो.  
 
मतदार ओळखपत्र डाउनलोड करण्यासाठी टिप्स- 
 
* सर्वप्रथम निवडणूक आयोगाच्या वेबसाईट https://voterportal.eci.gov.in वर जावे.
 
* या नंतर, मतदार सेवा पोर्टल (एनव्हीएसपी) च्या लॉगिन पेजवर  (https://www.nvsp.in/Acount/Login) पोहोचावे लागेल.
 
* येथे लॉगिन करण्यासाठी आपले अकाउंट असणे आवश्यक आहे.
 
* अकॉउंट नसल्यावर ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबरद्वारे खाते बनवले जाऊ शकते.
 
* अकाउंट बनविल्यावर काही तपशील भरून लॉगिन करावे.
 
* लॉगिन केल्यावर  E-EPIC डाउनलोड करण्याचे ऑप्शन दिसेल 
 
* डाउनलोड ऑप्शनवर क्लिक केल्यावर PDF फाईल सहजपणे  डाउनलोड होईल.
 
ज्यांनी मतदार कार्डासाठी अर्ज केला आहे आणि ज्यांचा मोबाईल नंबर निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असेल त्यांनाच डिजीटल मतदार ओळखपत्र डाउनलोड करता येईल