Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना 2021 माहिती, नोंदणीची प्रक्रिया, उद्दिष्टे, पात्रता, फायदे जाणून घ्या

Updated: सोमवार, 21 डिसेंबर 2020 (14:25 IST)
 
ग्रामीण भागात गोठे आणि शेड बांधणे-
या योजनेच्या अंतर्गत गायी आणि म्हशीं साठी गोठे बांधले जातील आणि शेळ्या आणि मेंढ्यांसाठी शेड बांधले जातील. या योजनेंतर्गत पोल्ट्री शेड उघडण्यासाठी देखील सरकार मदत करेल. या योजनेचा फायदा दोन जनावरे असलेले शेतकरी बांधव देखील घेऊ शकतात. यासह मातीची गुणवत्तेत सुधार करण्यासाठी सरकार शेतकरी बांधवांची मदत देखील करेल आणि ढोरांचे मूत्र आणि शेणाला साठवून त्याला खत म्हणून वापरण्यास शेतकरी बांधवाना प्रोत्साहित केले जाईल.

महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेचे उद्दिष्टे -
या योजनेचा उद्दिष्ट सर्व राज्यातील शेतकरी बांधव आणि ग्रामीण भागाचा विकास करणे आहे. या योजनेमुळे शेतकरी बांधवांचे उत्पन्नात वाढ होईल आणि गावाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होईल. या योजने मुळे  राज्यातील प्रत्येक शेतकरी आत्मनिर्भर बनेल आणि त्यांना रोजगार मिळेल. या योजनेच्या माध्यमाने सर्व पात्र शेतकरी बांधव सक्षम बनतील.

महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृध्दी योजना 2021 चे फायदे आणि वैशिष्ट्ये -
ही योजना एनएससी प्रमुख शरद पवार जी यांच्या नावाने सुरू केली आहे. 
* या योजनेच्या माध्यमाने शेतकरी बांधव आणि गावाचे विकास केले जाईल.
* या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे. 
* या योजने मुळे शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात वाढ होईल.
* महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी योजनेच्या संयुक्त रूपाने संपूर्ण महाराष्ट्रात राबविली जाईल.
* या योजनेच्या माध्यमातून गावाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होईल.
* या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात गायी म्हशीसाठी गोठा आणि शेळ्या आणि मेंढ्यांसाठी शेड बांधले जातील.
* या योजने अंतर्गत पोल्ट्री शेड उघडण्यासाठी देखील सरकार मदत करेल.
* या योजनेचा फायदा दोन जनावरे असलेले शेतकरी बांधव देखील घेऊ शकतात.
* या योजनेच्या माध्यमाने मातीच्या गुणवत्तेला सुधारण्यासाठी सरकार मदत करेल. 
* या योजनेच्या माध्यमाने वैयक्तिक आणि सार्वजनिक कामांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येईल. 
 
महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेसाठी लागणारी पात्रता आणि महत्त्वाचे कागद पत्रे -
* अर्ज करणारा हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
* अर्ज करणारा ग्रामीण भागाचा रहिवाशी असावा.
* अर्ज करणारा शेतकरी असणे अनिवार्य आहे
.
महत्त्वाची कागद पत्रे -
* आधार कार्ड
* रेशन कार्ड
* निवास प्रमाण पत्र
* पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
* मोबाइल नंबर
* उत्पन्न प्रमाण पत्र
* मतदार ओळख पत्र.
 
अर्ज कसे करावे -
अर्ज करण्यासाठी अजून काही दिवस थांबावे लागेल. सध्या तरी या योजनेची घोषणाच सरकारने केली आहे. तपशीलवार माहितीसाठी आणि अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया सरकार द्वारा सांगण्यात येईल. त्यासाठी थोडा काळ थांबावे लागणार आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींच्या उत्तराधिकाऱ्याबाबत मोठा दावा, म्हणाले-देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान होतील

महाराष्ट्रातील २५ मतदारसंघांमधील ८५% पेक्षा जास्त मतदार गायब आणि त्यांची २०.७ दशलक्ष नावे SIR यादीत नाही

इस्रो ईओएस-०५ प्रक्षेपण: भारताची अंतराळातील नवी झेप, ईओएस-०५ चे वैशिष्ट्य जाणून घ्या

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "मी २०२९ पर्यंत महाराष्ट्रातच राहीन! पक्षाने सांगितल्यास दिल्लीला जाईन"

LIVE: मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ते २०२९ पर्यंत महाराष्ट्रातच राहणार

पुढील लेख
Show comments