शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (21:55 IST)

Yoga For Better Eyesight: डोळ्याची दृष्टी वाढवण्यासाठी या 5 योगासनाचा सराव करा

Yoga For Eyes: डोळे ही शरीरातील सर्वात महत्वाची इंद्रिये आहेत आणि तरीही लोक त्यांची योग्य काळजी घेण्यात अपयशी ठरतात. दिवसभर लॅपटॉप किंवा मोबाईल स्क्रीनसमोर बसल्याने डोळ्यांवर परिणाम होतो, त्यामुळे डोळे दुखणे, पाणी येणे, जास्त वेळ वाचन किंवा लक्ष केंद्रित न केल्याने डोकेदुखी आणि दृष्टी कमी होणे या काही सामान्य समस्या उध्दभवत आहेत.योग्य जीवनशैली आणि डोळ्यांची काळजी घेतल्याने दृष्टी कमी होते मदत होते आणि डोळ्यांचा नंबर सतत वाढत नाही. अशी काही योगासनेही आहेत जी डोळ्यांसाठी चांगली असतात. हे दररोज केले जाऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या.
 
दृष्टी वाढवणारी योगासने-
1 त्राटक -
त्राटक किंवा एकटक लावून पाहणे हा योगासनांचा एक प्रकार आहे जो डोळ्यांसाठी केला जातो. हा व्यायाम करण्यासाठी एखाद्या विशिष्ट वस्तूकडे एकटक लावून पाहावे लागते. या साठी शरीराची हालचाल करू नये आणि पूर्ण लक्ष त्या वस्तूवर केंद्रित असले पाहिजे. हे ठराविक मर्यादित वेळेसाठी दररोज केले जाते. 
 
2 डोळे वर आणि खाली फिरवणे -
डोळे सतत वर आणि खाली हलवल्याने डोळ्यांची हालचाल  (Eye Movement) सुधारते आणि दृष्टी सुधारण्याची शक्यता वाढते. या व्यायामाची वेळ ठरवूनही करता येते. 
 
3 भस्त्रिका प्राणायाम-
हे योगासन सुखासनाच्या आसनात बसल्यानंतर केले जाते. हा श्वासोच्छवासाचा योग आहे, ज्याचा फुफ्फुस, कान, नाक आणि डोळे यावर परिणाम होतो. हे करण्यासाठी, मान आणि पाठीचा कणा सरळ ठेवून बसा. यानंतर शरीर न हलवता दीर्घ श्वास घ्या आणि दोन्ही नाकपुड्यांमधून आवाज काढताना वेगाने श्वास सोडा. 
 
4 डोळे मिचकावणे -
हा सर्वात सोपा व्यायाम आहे जो कुठेही आणि केव्हाही करता येतो. हे करण्यासाठी, प्रथम 10 सेकंद डोळे झपाट्याने मिचकावा आणि नंतर 20 सेकंद डोळे बंद करा, त्यांना आराम द्या आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा. ही प्रक्रिया 4-5 वेळा पुनरावृत्ती केली जाऊ शकते. 
 
5 तळहाताने डोळा झाकणे -
दोन्ही हातांचे तळवे एकत्र घासून डोळ्यांवर ठेवा. तळहाताच्या  उष्णतेने डोळे शेकले जातात. ही प्रक्रिया 5 ते 10 मिनिटे करा.