बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2021
Written By
Last Modified: मंगळवार, 27 जुलै 2021 (23:39 IST)

दैनिक राशीफल (28-07-21)

मेष : लोकांमध्ये मतभेद आणि अनोळखी लोकांचा विरोध आपणास अस्वस्थ करू शकते. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा. 
वृषभ : वेळेकडे लक्ष ठेवा. कार्यात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. कार्यक्षेत्रात मानसिक ताण होण्याची शक्यता आहे. आनंदाचे वातावरण असल्यामुळे कार्य सुरळीत होतील. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. मित्रांचा पाठिंबा राहील.
मिथुन : मनातल्या इच्छा पूर्ण होतील. उत्साहजनक बातम्या मिळतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मित्रांचा लाभ मिळेल. मानसन्मान होईल.  आपल्यासाठी अनुकूल वेळ आहे व महत्त्वाच्या कार्यांमध्ये यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. 
कर्क : कौटुंबिक वातावरण आनंद आणेल. आर्थिक विषयांमध्ये आपल्या प्रयत्नांमुळे आपणास यश मिळेल. ज्येष्ठ अधिकार्‍यांकडून आपणास समर्थन मिळेल. कौशल्याच्या क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. नवे वाहन मिळण्याची शक्यता आहे. 
सिहं : करियरबद्दल आपण हट्ट धरू शकता. कठोर परिश्रम केल्यानंतर यश मिळेल. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. आज आपल्या स्वतःच्या तर्कांना बळ मिळू शकेल. आपण नव्या नोकरीसाठी संधी शोधू शकता किंवा नवी नोकरी सुरु करण्यासाठी संमतीच्या योजना बनवू शकता. 
कन्या : महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी दिवस चांगला नाही. उत्साहवर्धक बातमी मिळाल्याने आनंद होईल. इच्छित कार्ये योग्य वेळी होतील. शत्रूंवर प्रभाव वाढेल. खरेदीसाठी उत्तम वेळ. आज रात्री संवेदनशील बनवण्याकडे आपला कल वाढू शकतो. 
तूळ : आपल्या कुटुंबात बर्‍याच काळापासून चालणारा एखादा वादाचा विषय आपणास अस्वस्थ करेल. व्यापारात आपल्या सेवेच्या मोबदल्यात योग्य लाभ मिळेल. आजचा दिवस महत्वपूर्ण मानसशास्त्रीय अंतर्दृष्टी घेऊन येईल. आपला एखादा मित्र आपल्या विचारांबद्दल महत्वपूर्ण सल्ला देऊ शकतो. 
 
वृश्चिक : काही गोष्टी आपल्या जीवनात आकस्मिकरीत्या आनंद आणतील. आपल्या नवीन आवडींना प्रोत्साहन द्या आणि जीवनात आलेल्या या परिवर्तनाचा आनंद घ्या. एखादी विषम परिस्थती उद्भवण्याआधी आपली आर्थिक स्थिती तपासून स्थिती पाहा. 
धनू : आजचा दिवस आपणास पैसे मिळवण्याच्या आणि व्यापाराच्या नव्या संधी देईल परंतु घाई करणे अडचणीत टाकू शकते. आज रात्री विश्रांती घ्या. रहाते घर  बदलण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. राजकीय व्यक्तींसाठी स्थिती संतोषजनक राहील. आर्थिक लाभ होईल.
मकर : आज आपला जोडीदार किंवा प्रिय व्यक्ती त्याच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्यावर दबाव आणू शकतो. घरगुती बाबतीत अधीरता टाळा. आर्थिक बाबतीत काळ अनुकूल आहे. सामाजिक कार्यांमध्ये सहयोग अनुकूल राहील व मान-सन्मान वाढेल.
कुंभ : मानसन्मानाच्या क्षेत्रात वाढ होईल. कामात एखाद्याचे सहकार्य प्रगतीचे कारण बनेल. आर्थिक विषयांमध्ये थोड्या अडचणी येऊ शकतात. करीयरसंदर्भातील नवी संधी मिळण्याची शक्यता. त्यामुळे घरांत उत्साहाचे वातावरण होईल.
मीन : ठरविलेले पूर्ण करण्यासाठी असे प्रसंग प्रेरणादायी ठरतील. यथायोग्य विचार करून कार्य करा. निष्कारण प्रश्नांचा त्रास राहील. आरोग्याची काळजी घ्या. व्यापार व्यवसायात वेळ साधारण राहील. देवाण-घेवाण टाळा.