शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2022
Written By
Last Modified: सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (16:37 IST)

मीन वार्षिक राशि भविष्य 2022 Pisces Yearly Horoscope 2022

मीन राशी भविष्य 2022 नुसार हे वर्ष ह्या राशीच्या जातकांसाठी नेहमीपेक्षा उत्तम असणार आहे. हे वर्ष करियरच्या दृष्टीने तारका प्रमाणे चमकणारे असेल. आपण कार्यक्षेत्रात कठोर परिश्रम करून आपली प्रतिमा सुधारण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ मिळेल. आपल्या राशीवर पडणारा गुरूचा प्रभाव काही प्रमाणात त्रास देऊ शकतो. वर्षाच्या मध्यात सुख-सोयीं मध्ये वाढ होईल.
 
मीन वार्षिक राशिभविष्य 2022 नुसार ह्या वर्षी ह्या राशीच्या स्वामीचा अनुकूल गोचर स्वघरात होईल, या मुळे नोकरी आणि व्यवसायात नवीन उंची गाठाल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना केलेल्या कष्टाचे चांगले परिणाम मिळतील. कामाच्या ठिकाणी या  वर्षी कोणत्याही प्रकारच्या जोखीम घेणे टाळावे.
 
कौटुंबिक जीवनात सर्व प्रकारचे तणाव दूर होतील. घरातील मतभेद संपतील. कुटुंबियांसह शुभ समारंभाचा आनंद घ्याल. विवाहितांना हे वर्ष खास असू शकतं. वैवाहिक घरात गुरुची दृष्टी असल्याने वैवाहिक जीवनात काही चांगले अनुभव मिळतील. जोडीदारामुळे आपण आनंदी राहाल. वर्षाचा मध्यभाग काही कटू अनुभव देईल, या मुळे निराश व्हाल. या वर्षी प्रेम जीवनात सामंजस्यपूर्व स्थिती बनू  शकते. या काळात राशिस्वामींची दृष्टी प्रेम संबंधावर राहील. प्रियकरासह छोट्या-छोट्या गोष्टींवर वाद होतील. प्रत्येक परिस्थितीत संयम  बाळगून काम करा.
 
विद्यार्थीवर्गाला हे वर्ष मंगळाच्या प्रभावामुळे अभ्यासात यश मिळेल. या वर्षी अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. शनीदेव काही कारणाने लक्ष विचलित करू शकतात, या मुळे वर्षाच्या सुरवातीपासूनच कठीण परिश्रम करावे लागतील.
 
मीन राशिभविष्य 2022 नुसार आर्थिक जीवन
मीन राशीच्या जातकाचे आर्थिक जीवन चांगले जाणार. उत्पन्न आणि लाभाचा अकराव्या घराचा स्वामी स्वगृहात विद्यमान राहील. आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून पैसे कमावता येईल. एप्रिलमहिनाच्या मध्यांतर शनीचे आपल्या राशीच्या अकराव्या घरातून बाराव्या घरात गोचर होईल. हे उत्पन्नाचे नवीन साधन निर्माण करेल. एप्रिलच्या मध्यकाळापासून पैसे साठवण्यात यशस्वी व्हाल. आपण एखाद्या पॉलिसी मध्ये गुंतवणूक करण्याचे निर्णय घ्याल.  
 
ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या मध्यकाळात धनाच्या द्वितीय घराचे  स्वामी मंगळाचे होणारे फेरबदल आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल घडवून आणेल. या वर्षी पगारात वाढ होऊन पदोन्नती होण्याची शक्यता आहे. वर्षाच्या अखेरीस नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यापासून ते डिसेंबरच्या शेवटी गुरुचे गोचर आपल्या राशीत होईल या मुळे प्रथम भाव प्रभावित होईल. आपण सुख-सोईंसाठी मोकळेपणाने खर्च कराल. या काळात धनखर्च होऊ शकतो. गुरुची दृष्टी भाग्य आणि वडिलोपार्जित गोष्टीच्या नवव्या घरात पडेल. वडिलोपार्जित संपत्तीपासून लाभ मिळण्याची शक्यता आहे.
 
मीन राशिभविष्य 2022 नुसार आरोग्य
येणारे नवीन वर्ष  या  राशीच्या जातकांसाठी सामान्य फळ घेऊन येणार. सुरवातीचा काळ संमिश्र असेल. जानेवारीच्या मध्यात मंगळाचे गोचर दहाव्या भावात होईल. या काळात आरोग्य सुधारेल जेणेकरून आपण निरोगी आयुष्य जगाल. एप्रिलच्या मध्यकाळापासून शनीची दृष्टी रोग घरावर पडेल. या काळात तब्बेतीची काळजी घावी लागेल. लहान सहान समस्येकडे दुर्लक्ष ना करता चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. मे महिन्याच्या मध्यापासून पहिल्या आणि लग्नाभावात मंगळ, शुक्र आणि गुरुची युती होईल या मुळे मानसिक तणावात वाढ होईल. या  काळात डोकेदुखी सारख्या समस्यांना सामोरी जावे लागू शकते.
 
मे ते ऑगस्ट ह्या कालावधीत पालकांच्या प्रकृतीत सुधार होण्याची शक्यता आहे यामुळे आपण काहीसे तणावमुक्त राहाल. वर्षाचा शेवटचा टप्पा म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या  कालावधीत प्रवासाचे योग्य संभवतात. प्रवासात काही समस्या उद्भवू शकतात, अस्या परिस्थितीत प्रवास करणे टाळा. प्रवासात विशेष खबरदारी घ्या.
 
मीन राशिभविष्य 2022 नुसार करिअर
हे वर्ष मीन राशीच्या जातकांसाठी अनुकूल असणार आहे. सुरवातीच्या काळात मंगळाचे जानेवारीच्या मध्यांतरानंतर होणारे गोचर कार्यक्षेत्रात नेहमीपेक्षा चांगले परिणाम देणारे ठरेल. नोकरी किंवा व्यवसायात भरघोस यश मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना हे वर्ष नेहमीपेक्षा चांगले जाईल.
 
एप्रिल महिन्यात आपल्या स्वराशीत गुरुचे गोचर होईल या मुळे लग्नाभाव सक्रिय होईल. गुरुची दृष्टी भाग्य आणि सन्मानाच्या नवव्या घरावर राहील. नोकरदार लोकांना कार्यस्थळी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या मध्यकाळात या  राशीच्या जातकांच्या कार्यक्षेत्रावर मंगळाची दृष्टी पडेल. हा काळ पदोन्नती देणारा ठरेल. या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी प्रयत्न आणि परिश्रम सुरु ठेवा. 
 
व्यापारीवर्गाच्या जातकांसाठी हे वर्ष एप्रिल ते सप्टेंबर महिन्याच्या काळात चांगला असेल. राशिस्वामी गुरूच्या  सकारात्मक प्रभावामुळे चंद्रराशी आणि भाग्यभाव सक्रिय होईल. वर्षाचा शेवट व्यापारीवर्गासाठी चांगला जाणारा आहे. नोकरी करणारे जातक नोकरी सोडून व्यवसाय करण्याच्या विचारात असतील तर त्यांच्यासाठी चांगले योग आहे.
 
मीन राशिभविष्य 2022 नुसार शिक्षण
हे वर्ष या  राशीच्या जातकांच्या शैक्षणिक दृष्टीने चांगले जाणार आहे. जानेवारीच्या मध्यापासून जूनपर्यंत मंगळाचे धनु, मकर, कुंभ, आणि मीन राशीत होणारे गोचर या राशीच्या उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी चांगले सिद्ध होईल. स्पर्धापरीक्षा किंवा सरकारी परीक्षेची तैय्यारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट निकाल मिळण्याची शक्यता आहे. 13 एप्रिल ते सेप्टेंबरपर्यंतच्या काळात आपल्या राशीत होणारे गुरुचे गोचर पहिल्या घरावर परिणाम करेल या मुळे शिक्षणाच्या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्यांना भरघोस यश मिळेल. ऑगस्ट ते सेप्टेंबरचा काळ ग्रहांच्या स्थितीनुसार अनुकूल राहणार.

या काळात 3 मुख्य ग्रह सूर्य, बुध, आणि शुक्राची शिक्षणाच्या पाचव्या घरात होणारी युती या राशीच्या जातकांना स्पर्धापरीक्षेत चांगल्या गुणांसह यशस्वी करेल. उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल. जे विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहे त्यांना वर्षाच्या शेवटी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. वर्षाचे शेवटचे दोन महिने म्हणजे, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अपेक्षेनुसार फळ देणारे आहेत. या राशीच्या जतकांनी वर्षाच्या सुरवातीपासूनच शिक्षणात लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा.
 
मीन राशिभविष्य 2022 नुसार कौटुंबिक जीवन
या राशी च्या जातकांच्या कौटुंबिक जीवनात अनुकूल परिणाम मिळतील, विशेषत: मार्च आणि एप्रिल महिन्यात चवथ्या घराचा स्वामी बुध पहिल्या आणि दुसऱ्या घरात गोचर करेल .या मुळे अनुकूल परिणाम मिळण्याची शक्यता आहे. सुरवातीचा काळ घराचे वातावरण शांत असणार. आपण आपला वेळ कुटुंबियांसह घालवाल. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या टप्प्यापासून शनीचे कुंभ राशीत बदल होईल. हे बदल राशीच्या बाराव्या घरात होणार असून आपल्याला कुटुंबापासून दूर करेल. या काळात काही जातकांना परदेश गमनाची शक्यता आहे. 
 
मे ते ऑगस्ट महिन्याचा काळ चौथ्या घराच्या स्वामीचे राशीच्या अनुकूल घरात होणारे गोचर या  राशीच्या जातकांसाठी शुभ ठरेल. आईला आरोग्याशी संबंधित काही समस्या असतील तर या  काळात आरोग्यात सुधारणा होईल. आपले संबंध आईसह चांगले होतील. मे च्या मध्यकाळात गुरुचे आपल्या राशीत होणारे स्थान परिवर्तन आणि आपल्या राशीत विद्यमान असलेले दोन ग्रह मंगळ आणि शुक्रासह युती आपल्याला कुटुंबापासून लांब करेल आणि घरातील वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद आणि सहयोग मिळवून देईल. आपण मातुलपक्षाकडून लाभ मिळविण्यास यशस्वी व्हाल.

हे वर्ष ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत जुन्या आजारापासून मुक्ती देईल या मुळे आपण तणावमुक्त अनुभवाल. जुन्या आजाराचे आठव्या घरातील स्वामी सप्टेंबर महिन्यात आपल्या राशीत दुर्बल अवस्थेत विद्यमान राहील ह्यामुळे आपल्याला आजारापासून मुक्ती मिळेल. वर्षाच्याशेवटी आपल्याला सावधगिरी बाळगावी लागेल.या  दरम्यान कौटुंबिक जीवनात काळजीपूर्वक चालणे गरजेचे असेल. घरगुती वस्तूंवर पैसे खर्च करावे लागतील. घरातील शांततेचे वातावरण बिघडू शकते. कुटुंबियांना चांगली वागणूक द्या अन्यथा आपली प्रतिमा खराब होऊ शकते.
 
मीन राशिभविष्य 2022 नुसार वैवाहिक जीवन
या राशीच्या विवाहित लोकांसाठी वैवाहिक जीवनासाठी हा काळ नेहमीपेक्षा चांगला जाणार आहे, विशेषतः वर्षाच्या सुरवातीला म्हणजे जानेवारी ते मार्चपर्यंतचा काळ खूप चांगला असेल. मार्च महिन्यात सप्तम भावाचा स्वामी बुधाचा प्रभाव स्वगृही पदेल. या मुळे जोडीदाराशी मनमोकळेपणाने संवाद साधाल. या काळात आपल्या नात्यात प्रेम आणि रोमान्स जाणवेल. ही परिस्थती वैवाहिक जीवनात आनंद आणि शांती मिळवून देईल.
 
एप्रिलच्या मध्यांतर गुरुची दृष्टी विवाह घरावर राहील. या मुळे आपल्या नात्यात नवीनता येईल. मे च्या मध्यापासून ऑक्टोबर पर्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे. विवाहित जातकांना या काळात तणावपूर्ण परिस्थितीचा सामना करावा लागेल. या काळात विशेष काळजी घेऊन पुढे वाढावे. ऑक्टोबरच्या मध्यानंतर सातव्या भावाचा स्वामी अनिश्चिततेच्या आठव्या घरात विद्यमान राहील. 
 
हे वैवाहिक जीवनात वाद करण्यास कारणीभूत असेल. वर्षाच्या शेवटचे तीन महिने ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात आपल्याला संतान पक्षाकडून चांगली बातमी मिळेल. या मुळे वैवाहिक जीवनात सुख समृद्धी येईल. आपण अविवाहित असाल तर यंदा कर्तव्य आहे. वर्षाच्या मध्यात विवाहयोग येईल.
 
मीन राशिभविष्य 2022 नुसार प्रेमजीवन
हे वर्ष मीन राशीच्या जातकांच्या प्रेम संबंधात सामान्य फळ देणारे आहे कारण वर्षाच्या सुरवातीला आपल्या राशीत चवथ्या आणि सातव्या घरात बुध देव विद्यमान असणार. आपण अविवाहित असाल तर या काळात आपल्या आयुष्यात विशेष व्यक्तीचा प्रवेश होण्याची शक्यता आहे. आपण या व्यक्तीला सोशल मीडियाद्वारे भेटाल. हळू हळू ही व्यक्ती आपल्या आयुष्यातील महत्वाची व्यक्ती बनेल. 
 
एप्रिलच्या मध्यापासून जूनच्या मध्यकाळ प्रेमजीवनासाठी चांगला असेल. या काळात प्रियकराशी बोलताना शब्दांना जपून वापरा अन्यथा प्रियकराशी नात्यात दुरावा येईल. सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या मध्यकाळात सर्वप्रकारचे गैरसमज दूर होतील. अंतराच्या बाराव्या घराचा स्वामी प्रेम भावावर दृष्टी टाकेल यामुळे आपल्या जीवनात प्रेम आणि रोमान्स वाढेल. प्रियकराशी वाद न करता त्याला समजून घेण्याची गरज भासेल. वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर हा प्रेम जीवनासाठी सर्वात उत्तम काळ असणार आहे कारण या काळात प्रेम विवाह करण्याचा निर्णय घेत काही जातक प्रियकराची कुटुंबाशी ओळख करून देण्याचा प्रयत्न करतील.
 
ज्योतिषीय उपाय
जीवनात फायदेशीर परिणामासाठी गरीब आणि गरजूंना पिवळ्या वस्तूंचा दान करा.
कपाळावर हळदीचा टिळा लावा. या मुळे आपल्याला प्रत्येक कामात भरघोस यश मिळेल.
शुभ फळ मिळण्यासाठी धार्मिक ग्रंथाचे दान करा.
गुरु बृहस्पतीच्या बीज मंत्राचा नियमित जप करा.