शुक्रवार, 6 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2023
Written By
Last Modified: सोमवार, 18 सप्टेंबर 2023 (07:50 IST)

Weekly Horoscope साप्ताहिक भविष्यफल 18 ते 24 सप्टेंबर 2023

weekly rashifal
मेष : आय-व्ययमध्ये संतुलन राहील. कार्यक्षमतेत वृद्धि होईल. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा, आणि कामांना वेळेत पूर्ण करा. वित्तीय कामात अनुसंधान योग. मांगलिक, धार्मिक कामात अडथळा. बाह्य क्षेत्रात प्रवासा दरम्यान सावधगिरी बाळगा. 
 
वृषभ : शोध, अनुसंधानपूर्ण कामात पैसा आणि वेळ खर्च होण्याचा योग. कर्मक्षेत्रात भाग्यवर्धक परिवर्तन योग. भाग्यवर्धक यात्रा संभवतात. पद, प्रतिष्ठा संबंधी कामांसाठी यात्रा योग. धर्म, आध्यात्म, गूढ अनुसंधान संबंधी विशेष योग. 
 
मिथुन : नाते-वाईकांबरोबर मतभेद होण्याची शक्यता. वाद-विवाद करू नका. नोकरांवर अतिविश्वास ठेऊ नये. खर्चात कमी करण्याचा प्रयत्न करा. वाहने सावकाश चालवा. नोकरीत जबाबदारीनुरूप काम करा. मनोरंजनाचे योग येतील. सामाजिक आयोजनात सहभागी व्हाल.
 
कर्क : मित्रांच्या भेटी. दोस्ती अधिक घट्ट होईल. भरपूर खर्च करण्याएवढा पैसा येईल. महिलांच्या लक्षामुळे घरात सुख. आरोग्य ठीक. उत्साह राहील. वादांपासून लांब रहा. मित्रवर्ग, मुलांच्यासंबंधी कामात वेळ जाईल. आर्थिक क्षेत्रात शोधपूर्ण काम होण्याचा योग.
 
सिंह : आर्थिक उन्नति होईल. नोकरीत बदलीचे योग. जुना त्रास दूर होईल. लाभदायक बातमी कळेल. तब्बेतीची काळजी घ्या. बरोबर दिशेने प्रयत्न केल्यास अडकलेला पैसा मिळेल. अधिकारी आपल्या कार्यावर खूश राहतील. घराच्या समस्येच समाधान. 
 
कन्या : घरात मोठ्यांचा सल्ला मिळेल. राज्यपक्षाच्या कामांसाठी हा आठवडा उत्तम रहाण्याची शक्यता. आर्थिक संपन्नता वाढेल. दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल. साहित्यिक रूचि वाढेल.
 
तूळ : ज्ञान-शिक्षा, अनुसंधानावर विशेष व्यय होईल. कर्मक्षेत्रात यश, सन्मान, उपलब्धिचा योग. मनोरंजनात वेळ जाईल. अनुकूल परिणामांसाठी सक्रियता आणि निश्चितता आवश्यक आहे.पारिवारिक मतभेद वाढतील. आई-वडिलांच्या तब्बेती चांगल्या राहतील. 
 
वृश्चिक : मोठ्या व्यक्तीशी संपर्क. घरातील लोकांबरोबर मनोरंजन होईल. वेळ वाया घालवू नका. व्यापारात प्रगति होईल. ज्ञानवृद्धिसाठी स्वाध्यायात रूचि वाढेल. व्यापार उत्तम चालेले. विशेष कार्य झाल्यामुळे प्रसन्नता वाटेल. विरोधकांपासून सावध रहा.
 
धनु : सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक स्त्रोतात वाढ होईल. रोग निवारणार्थ यात्रा योग. लाभ प्राप्ति योग. मंगल कामांमध्ये वेळ जाईल. धन वृद्धि. कर्मक्षेत्रात उच्च स्तरीय कामे होतील. 
 
मकर : संपत्तीच्या कामात सक्रियता वाढेल. व्यापारिक भागीदारीत विशेष वृद्धि. धार्मिक समस्यांवर विचार वाद, कायदेशीर प्रश्न व्यवस्थित सोडवा, आहारावर नियंत्रण ठेवा. मित्र,मुलांच्या संबंधात समस्यांवर यात्रा आणि व्यय योग.
 
कुंभ : धार्मिक कार्यात वेळ जाईल. महत्वपूर्ण कामे पूर्ण होतील. आत्मविश्वासाने काम करा. शुभचिंतकांची भेट घडेल. कायदेशीर बाबींचा निकाल लागेल. निर्णय घेण्यात असुविधा, ज्यामुळे कार्याची गति प्रभावित होधल. पित्ताचा त्रास संभवतो. 
 
मीन : विवादित लांबलेल्या प्रकरणां सोडविण्यासाठी केलेली यात्रा लाभदायी ठरेल. व्यापारिक यात्रेतुन लाभ प्राप्तिचा विशेष योग. वित्तीय कामात अनुसंधान योग. आर्थिक क्षेत्रात लांबलेल्या प्रकरणात विशेष काम होईल. व्यापारात गुंतवणुकीसाठी योग्य वेळ नाही.