सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2024
Written By
Last Modified: शनिवार, 29 जून 2024 (19:36 IST)

July 2024 Horoscope : जुलैमध्ये या राशींसाठी चांगले दिवस येतील, येथे पहा मेष ते मीन राशीचे मासिक राशीफळ

मेष - या महिन्यात आनंद आणि सौभाग्य वाढेल, तुम्ही धैर्याने आणि शौर्याने प्रत्येक क्षेत्रात विजय मिळवाल. शनी अनुकूल असून  तिसऱ्या भावात आहे प्रत्येक कामात यशाचा मार्ग मोकळा होईल. विवाह, पुत्रप्राप्ती इत्यादी शुभ घटनांसाठी हा काळ अनुकूल आहे. जंगम मालमत्तेचा लाभ होईल, सरकारी नोकरी करणाऱ्यांना नवीन पदाचा लाभ मिळेल.
 
वृषभ - या महिन्यात तुमच्यासाठी आनंद आणि दु:ख सम प्रमाणे असेल भांडण आणि त्रासांपासून दूर राहणे फायदेशीर ठरेल, अन्यथा उशिराने काम पूर्ण होईल आणि मुलांकडून चांगली बातमी मिळेल बृहस्पति आणि शनीच्या शांतीसाठी धार्मिक विधी करा.ऊँ बृँ बृहस्पतये नमः तथा ऊँ शं शनैश्चराय नमः या मंत्राचा नियमाने 1 -1 माळ करा 
 
मिथुन - या महिन्यात शारीरिक सुख आणि आरोग्य कमी होईल, पुत्रांशी मतभेद होऊ शकतात, विश्वासू कडून धोका मिळू शकतो. उपजीविकेच्या क्षेत्रात लोक तुमच्या कामावर विनाकारण टीका करतील तुम्ही जे काही काम कराल, त्यात तुम्हाला विविध समस्यांचा सामना करावा लागेल..विरोधक सक्रिय होतील.तुम्हाला नुकसान पोहोचतील.कौटुंबिक वादाची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल आहे.
 
कर्क - या महिन्यात आर्थिक आणि व्यवसायिक स्थिती अनुकूल राहील.
पद मान मिळेल. आजीविका साठी केलेले प्रयत्न पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांचे पद, अधिकार आणि कौटुंबिक समस्या दूर होतील. सट्टा,शेअरने लाभ होतील. नौकरदार वर्गाला पद अधिकार मिळतील. कौटुंबिक त्रास पासून सुटका होईल. धार्मिक अध्यात्मिक कार्यात मन लागेल. शत्रूंचा पराभव होईल. 
 
सिंह - या महिन्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुम्हाला राजकीय लाभ मिळतील.प्रभावशाली व्यक्तींशी संपर्क वाढतील. चांगल्या अवसरांची प्राप्ती होईल.आपले व्यवहार कौशल्ये सिद्धी आणि प्रसिद्धी देणारे आहे. जुन्या मित्रांशी संपर्क होतील. घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील शेअर आणि सट्टा पासून दूर राहा. व्यवसायात वाढ होईल. भविष्यात काही करण्याची स्थिती बनेल. 
 
कन्या - या महिन्यात बौद्धिक विकास होईल. लेखन-अध्ययन भाषण-प्रवचन मध्ये आवड वाढेल. जमिनीशी संबंधित काम बनतील. गृह-भूमी, मुलगा-मुलगी आणि भाऊ बहिणींचे सुख मिळतील. आपल्या बौद्धिक कौशल्याने सर्वदूर प्रशंसा मिळेल.नवीन ओळख होतील.संपत्तीत वाढ होतील. भाग्याची साथ लाभेल.बचत पत्र, शेअर्स, संपत्तीची खरेदी विक्री होऊ शकते.लाभ होतील.  
 
तूळ - या महिन्यात तुमच्या संयमाची, गांभीर्याची आणि सहनशीलतेची परीक्षा होईल, नोकरी-व्यवसायात अडचणी वाढू शकतात, तरीही जोखमीचे काम करू नका  शारीरिक व्याधी होतील.जरी उत्पन्न असेल, तर बचतीचा अभाव दिसून येईल.शिक्षणाच्या क्षेत्रात परिश्रम केल्याने यश मिळेल.
 
वृश्चिक - या महिन्यात अनेक क्षेत्रांत तुमची क्षमता वाढेल आणि तुमचा अभ्यास, लेखन आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये रुची वाढेल कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडतील, लग्न, पुत्रजन्म आदी शुभ कार्ये होतील. काही शारीरिक समस्या असतील.सध्या शनीची ढैय्या चालली आहे. सर्व सुख असून मित्रांशी वाद होणार नाही. काही न काही शारीरिक त्रास संभवतील.
 
धनु - या महिन्यात नौकरी संबंधित तुम्हाला चांगल्या संगतीचा फायदा होईल, प्रशासकीय किंवा शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मानसिक त्रास होईल तुमच्या बौद्धिक कौशल्याने  सर्वत्र तुमची प्रशंसा होईल राजकीय आणि न्यायालयीन संबंधित कार्यात उशीर होईल त्यामुळे मन अस्वस्थ राहील.
 
मकर - या महिन्यात पत्नी आणि संततीच्या सुखासाठी अनुकूल परिस्थिती असेल, तुम्हाला आवश्यकतेनुसार मान-सन्मान, प्रसिद्धी मिळण्याचा क्रम चालू राहील जमीन, वास्तू, जंगम मालमत्ता संबंधित कार्यात यश मिळेल.भाग्याची साथ मिळेल. कौटुंबात शुभ कार्य पूर्ण होईल.
 
कुंभ - या महिन्यात मानसिक त्रासाचे प्रसंग येतील. काही अनपेक्षित घटनांमुळे तुम्ही दु:खी व्हाल, विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता कमकुवत राहील. कौटुंबिक बाबींवर खर्च करणे, मनात उतेजना स्वार्थीपणा वाढेल  आरोग्याकडे लक्ष ठेवा.
 
मीन - या महिन्यात तुम्हाला विद्यार्जन, धनार्जन आणि सन्मानासाठी अधिक मेहनत करावी लागेल, आर्थिक उत्पन्नासाठी प्रयत्न करावे लागणार. तुमची आर्थिक स्थिती संतुलित राहील.उधारी उसनवारी वसूल होईल.सामाजिक-राजनीतिक संपर्क प्रभावाचा लाभ मिळेल. व्यावसायिक प्रवास यशस्वी होतील.कौटुंबिक सुख मध्यम राहील. 
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.