गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. अयोध्या विशेष
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019 (22:55 IST)

उत्तर प्रदेशात ९ ते ११ नोव्हेंबरपर्यंत सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या प्रकरणाचा निकाल शनिवारी सकाळी साडे दहा वाजता लागणार आहे. त्यापार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात ९ ते ११ नोव्हेंबरपर्यंत सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल सुरक्षेचा आढावा घेतला होता. या बैठकीत त्यांनी राज्यात मोठा बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले होते. अयोध्येत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आल्याने अयोध्येला छावणीचं स्वरुप आलं आहे. तसेच उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.