सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

सरकारी बँकांमध्ये 13 अब्ज डॉलर्सचा घोटाळा

सरकारी बँकांमध्ये गेल्या सहा महिन्यात 13.3 अब्ज डॉलर्स म्हणजे साधारण 958 अब्ज रुपयांचे घोटाळे झाल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं.  
 
बँकामधील घोटाळे रोखण्यासाठी सरकारने पुरेशा उपाययोजना राबवल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सरकारी बँकामध्ये 5,743 घोटाळ्यांची नोंद झाली आहे. मात्र 25 अब्ज रुपयांचे 1000 घोटाळे गेल्या काही महिन्यातले आहेत असं त्यांनी सांगितलं. बँकांनी 3,38,000 खाती गोठवली आहेत असं त्या म्हणाल्या. स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकांमध्ये सर्वाधिक घोटाळे नोंदले गेले आहेत.