मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 20 नोव्हेंबर 2019 (10:30 IST)

सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी शिफारसीची गरज नाही- केंद्र सरकार

विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी शिफारस करण्याची गरज नाही, असा खुलासा केंद्र सरकारने केला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. लिखित उत्तरात केंद्र सरकारने आपली भूमिका मांडली. योग्यवेळी सावरकरांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल अशी माहितीही सरकारकडून देण्यात आली.
 
समाजातील विविध धुरिणांना गौरवण्यात यावं अशा शिफारसी केल्या जातात. मात्र या पुरस्कारासाठी औपचारिक शिफारशीची गरज नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं. राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने सावरकरांना भारतरत्न पुरस्काने सन्मानित करू असं म्हटलं होतं.