मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 6 नोव्हेंबर 2019 (12:09 IST)

PMC बँकेतून आता 50 हजार रुपये काढता येणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतून (PMC बँक) पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे. रिझर्व्ह बँकेच्या नवीन आदेशानुसार आता पैसे काढण्याची मर्यादा 40 हजार रुपयांवरून 50 हजार रुपये करण्यात आली आहे.
 
व्यवहारात अनियमितता आढळल्याने रिझर्व्ह बँकेनं PMCवर निर्बंध लादले होते. त्यानुसार बँकेतून पैसे काढण्यावरही मर्यादा आल्या होत्या. ही मर्यादा रिझर्व्ह बँक हळूहळू सैल करत आहे.
 
23 सप्टेंबरला बँकेवर निर्बंध लादण्यात आल्यानंतर आतापर्यंत पैसे काढण्याची मर्यादा चारवेळा वाढवण्यात आली आहे. सुरुवातीला पैसे काढण्याची मर्यादा केवळ एक हजार रुपये इतकीच होती. ती नंतर वाढवून 10 हजार रुपये करण्यात आली. नंतर ही मर्यादा 25 हजार आणि 40 हजार पर्यंत वाढवली गेली. आता आता चौथ्यांदा वाढ करत ही मर्यादा आज ५० हजार रुपये करण्यात आली आहे.