मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 26 सप्टेंबर 2019 (09:58 IST)

पुण्यात पावसामुळे भिंत कोसळून 7 जणांचा मृत्यू

प्रचंड पावसामुळे पुण्यातल्या आंबील ओढ्याला आलेल्या पुरामुळे अरण्येश्वर येथील टांगेवाला कॉलनीत सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा अधिक असण्याची शक्यता असून एनडीआरएफच्या पथकांकडून शोधमोहीम सुरू आहे.
टांगेवाला कॉलनी नाल्याच्या अत्यंत जवळ असून बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यावर पाणी वाढले. हे पाणी कॉलनीतल्या घरांमध्ये घुसले. त्यामुळे भिंत खचून सात जणांचा मृत्यू झाला.
 
सापडलेल्या पाच मृतदेहांपैकी तीन मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून अन्य दोन मृतदेह काढण्याचे काम एनडीआरएफची तीन पथकं करत होती. मृतदेहांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.