शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019 (11:24 IST)

भाजपनं दोन पावलं मागे येऊन सेनेसोबत तडजोड करावी - आठवले

महाराष्ट्रातील सत्तेच्या वाटपावरून महायुती फिस्कटली आणि शिवसेना-भाजप वेगवेगळे झाले. मात्र, या दोन पक्षांना एकत्रित आणण्यासाठी आपणही प्रयत्न करणार असल्याचं रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.
 
भाजपनेही दोन पावलं मागे येऊन महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेनेसोबत तडजोड करून सत्ता स्थापन करावी, असं आवाहन रामदास आठवलेंनी केलंय.
 
शिवसेना आणि भाजपची 30 वर्षांची जुनी युती आहे. या दोन्ही पक्षांना एकत्र आणून त्यांच्यात दिलजमाई करण्याच प्रयत्न करेन, असंही आठवले म्हणाले. राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचंही आठवलेंनी सांगितलं.