मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 6 ऑगस्ट 2019 (08:50 IST)

EVM गेले तर भाजपही जाणार - राज ठाकरे

ईव्हीएम गेलं तर भाजपही जाईल असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ईव्हीएमविरोधात राज्यासह देशभरातील विरोधी पक्षांचे नेते एकवटले आहे.
 
मतपत्रिकेद्वारे मतदान घेतलं नाही तर देशातील लोकशाही धोक्यात येईल असंही ते म्हणाले.
 
अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी विकसित आहेत. ते अजूनही मतपत्रिकेचा वापर करतात. जर ईव्हीएम निर्दोष असतील तरी ते देश मतपत्रिकेचा वापर का करतात? असा सवाल राज यांनी केला.
 
याच मुद्द्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली होती. आगामी विधानसभा निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी केली होती. या मुद्यावर जनजागृतीसाठी राज्यभरात रॅली काढण्यात येणार आहे.