मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 26 डिसेंबर 2019 (08:56 IST)

कर्जमाफीच्या धोरणात बदल करा - राजू शेट्टी

सरकारनं लवकरात लवकर कर्जमाफीच्या निर्णयात बदल केला नाही, तर त्यांना रोषाला सामोरं जावं लागेल, असं वक्तव्य शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केलं आहे. ते बुधवारी कोल्हापूरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.  
 
यावेळी त्यांनी म्हटलं की, "सरकारला कर्जमाफीच्या धोरणात बदल करावा लागेल. अन्यथा त्यांना रोषाचा सामना करावा लागेल. मुळात सरकारनं व्यापक चर्चा करून कर्जमाफी जाहीर केली असती तर बरं झालं असतं."
 
यावर्षी ज्या शेतकऱ्यांना कर्ज घेतलं, ते जून 2020मध्ये थकितमध्ये जाणार आहे. त्यामुळे 30 सप्टेंबर 2019पर्यंतच्या कर्जाची माफी कशी करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
 
दरम्यान, "2 लाखांहून अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठीही स्वतंत्र विचार करण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यात आयोजित कार्यक्रमात म्हटलं आहे."