कोरोना काळात भारतीयांची सरासरी कमाई 5 टक्क्यांनी घटली
कोरोना व्हायरस संकट आणि लॉकडाऊनच्या काळात भारतीयांची कमाई 5 टक्क्यांनी घटली आहे, अशी माहिती भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) इकॉनॉमिक विंगने तयार केलेल्या अहवालातून समोर आली आहे.
या काळात भारतीयांची कमाई 1.52 लाख कोटी रुपयांऐवजी 1.43 लाख कोटी इतकी झाली. या कालावधीत 3.8 टक्के घसरण दिसून आली.
दिल्ली, चंदीगढ आणि गुजरात अशा ठिकाणी दरडोई उत्पन्नात सर्वाधिक घट झाली आहे. दिल्लीत दरडोई उत्पन्न 15.4 टक्क्यांनी कमी झालं आहे. तर चंदीगढ आणि गुजरातमध्ये अनुक्रमे 13.9 व 11.6 टक्के इतकी घट झाली आहे.