सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 7 मार्च 2023 (08:36 IST)

सनी देओलला शेतकरी दादा म्हणाले, तुम्ही तर सनी देओलसारखेच दिसता

sunney deol
दिवसभरातली शेतीभातीची कामं आटोपून शेतकरी बैलगाडी चालवत घरी परतत असतो. त्याचवेळी गावात फेरफटका मारत असलेला माणूस शेतकऱ्याला थांबवतो. त्याच्याशी गप्पा मारू लागतो.
 
गप्पा मारतानाच शेतकऱ्याच्या काहीतरी लक्षात येतं आणि तो एकदम विचारतो- तुम्ही सनी देओलसारखे दिसताय! पलीकडचा माणूस खळखळून हसतो आणि म्हणतो हो, मी सनी देओलच आहे. शेतकरी एकदम आनंदतो.
 
आम्ही तुमचे आणि तुमच्या वडिलांचे व्हीडिओ मोबाईलवर पाहत असतो असं शेतकरी सांगतो. सनी देओल त्या शेतकऱ्याची विचारपूस करतात. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला असं तो शेतकरी सनी देओलला सांगतो.
 
सनी देओल गदर चित्रपटाच्या चित्रीकरणानिमित्ताने राज्यात आहेत. अहमदनगर भागात हे चित्रीकरण सुरू आहे.
 
सनी देओल, अमिषा पटेल आणि अमरिश पुरी अभिनित गदर एक प्रेमकहाणी चित्रपट प्रचंड हिट झाला होता.
 
चित्रपटातली गाणीही लोकप्रिय झाली होती. 18 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या गदर एक प्रेम कथा चित्रपटाने तब्बल 256 कोटींची कमाई केली होती.
 
सनी देओल यांनी स्वत:च हा व्हीडिओ शेअर केला आहे. देओल यांनी शेतकऱ्याबरोबरचा एक फोटोही शेअर केला आहे. हा फोटोही व्हायरल झाला आहे.
 
बॉर्डर, गदर, अर्जून, सल्तन, डकैत, त्रिदेव, चालबाज, विष्णू देवा, यमला पगला दिवाना या चित्रपटातील भूमिकांसाठी सनी देओल चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत.
 
11 ऑगस्ट 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे.
 
अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते सनी देओल गुरदासपूर मतदारसंघाचे खासदार आहेत.
Published By -Smita Joshi