सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019 (12:48 IST)

'शरद पवार असेपर्यंत सरकार टिकणार'

"शरद पवारांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीत भीष्म पितामह यांची भूमिका बजावली. महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युतीचे सर्व श्रेय शरद पवारांना आहे. ते नसते तर महाराष्ट्रामध्ये या तिन्ही पक्षांची युती होऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं नसतं," असं मत भाजप खासदार जगदंबिका पाल यांनी व्यक्त केलं आहे.
 
"आम्ही सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादीकडे गेलो नव्हतो. अजित पवारच त्यांच्या 54 आमदारांच्या स्वाक्षऱ्या असणारे पाठिंबा पत्र आमच्याकडे घेऊन आले होते. त्याच्याआधारेच आम्ही सत्तास्थापनेचा दावा केला," असंही पाल यांनी म्हटलं आहे.