बेअर ग्रिल्सला हिंदी कशी समजली, मोदींनी केला उलगडा
डिस्कव्हरी चॅनेलवर नुकत्याच झालेल्या 'मॅन व्हर्सेस वाइल्ड' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेअर ग्रिल्स एकत्र दिसले. या कार्यक्रमात मोदी चक्क ब्रिटनमध्ये जन्मलेल्या बेअरशी हिंदीत बोलले आणि मोदींच्या म्हणण्याला तो प्रतिसादही देत होता.
त्यामुळे बेअरला हिंदी कधीपासून यायला लागली? तो हिंदी शिकला का? असे प्रश्नही निर्माण झाले. मात्र मोदींनी या सर्व प्रश्नांना 'मन की बात' या कार्यक्रमातून उत्तर देताना बेअर आणि त्यांच्यामधील संभाषणाबाबतचं गुपीतही उघड केलं.
बेअरच्या कानात एक वायरलेस उपकरण लावण्यात आले होतं. त्यामध्ये मोदी हिंदीत बोलत असलेले शब्द इंग्रजीत भाषांतरित केले जात होते. त्यामुळे बेअरला ते काय बोलत होते, हे कळल्याचा खुलासा मोदींनी केला आहे.