गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019 (09:48 IST)

रस्ते कंत्राटदाराकडून लाच घेणाऱ्या आमदार, खासदारांची चौकशी करा

रस्ते कंत्राटदाराकडून लाच घेणाऱ्या आमदार आणि खासदारांची चौकशी करा, असं वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. 
 
रस्ते कंत्राटदाराकडून लाच घेणाऱ्या आमदार आणि खासदारांची एक यादीच नितीन गडकरी यांनी CBI आणि EDला दिली आहे. यासोबत या लोकप्रतिनिधींच्या गुप्त संवादाच्या ऑडिओ तसंच व्हीडिओ फाईल्सही दिल्या आहेत.
 
"चार आठवड्यांपूर्वी माझ्याकडे आलेल्या कंत्राटदाराला मी ऑडिओ तसंच व्हीडिओ फाईल्स रेकॉरड करायला सांगितलं होतं. ही सर्व माहिती मी CBI आणि EDला दिली आहे. रस्ते बांधणीत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही," असं गडकरींनी म्हटलं आहे.