शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

नाट्यसंमेलन अध्यक्षपदी जब्बार पटेल

अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी अखेर प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि रंगकर्मी डॉ. जब्बार पटेल यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. नाट्यसंमेलनाचं हे १००वं वर्ष असल्याने नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष कोण होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.
 
या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी आज पटेल यांच्या नावाची घोषणा केली.
 
पटेल यांच्या नावावर आम्ही मागेच शिक्कामोर्तब केलं होतं. आज झालेल्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेऊन पटेल यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येत असल्याचं कांबळी म्हणाले. राज्यात नवं सरकार आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कलाप्रेमी असून ते नाट्यपरिषदेला सर्व सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे, असंही त्यांनी सांगितलं.