बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 18 नोव्हेंबर 2021 (09:58 IST)

अनिल देशमुखांना झालेल्या त्रासाचा एक-एक मिनिट वसूल करू - शरद पवार

अनिल देशमुख यांची वस्तुस्थिती मला माहित आहे. ते पुन्हा बाहेर येऊन सक्रिय होतील. त्यांना जो त्रास दिला जात आहे, त्याचा एक-एक मिनिट मी वसूल करेन, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
 
शरद पवार चार दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना शरद पवार यांनी अनिल देशमुख यांचा उल्लेख केला.
 
'राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर नागपूरला आलो आणि माझ्यासोबत अनिल देशमुख नाहीत, असा हा पहिलाच दिवस आहे, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, काय घडलं ते त्यांनी मला सगळं सांगितलं होतं. आरोप करणारे फरार झाले. पण अनिल देशमुख तुरुंगात आहेत, याकडे पवार यांनी लक्ष वेधलं.