सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019 (10:55 IST)

स्विस बँकेतील खातेदारांची यादी भारताकडे

स्विस बँकेत असलेल्या 75 देशातील 31 लाख खातेदारांची माहिती संबंधित देशांना सोपवण्यात आली आहे. यात काही भारतीय खातेदारांचाही समावेश आहे, ज्यांची यादी बँकेने भारत सरकारला सोपवली आहे.
 
अनेक भारतीयांनी आपला काळा पैसा स्विस बँकेत लपवून ठेवल्याचं अनेकदा बोललं जातं. तो आता परत येणार का, हा आता प्रश्न आहे.
 
पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये भारताला आणखी खात्यांची माहिती मिळेल. भारत आणि स्वित्झर्लंड सरकारमध्ये बँकिंग माहितीच्या देवाण-घेवाणीचा करार झाला होता. या करारानुसार भारतीय खातेदारांची माहिती सरकारला देण्यात आली आहे.