1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 27 एप्रिल 2019 (12:08 IST)

वाराणसीत शंभराहून अधिक जवान मोदींविरोधात लढणार

100 jawans
वाराणसीत 100 हून अधिक निवृत्त आणि निलंबित लष्कर आणि निमलष्कराच्या जवानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात लढण्याचा निर्धार केला आहे.  
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी लष्कराला दुर्बळ करत असून भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहेत, असं या जवानांचं म्हणणं आहे. हे सर्व जवान वाराणसीमधील मडुआ डीह येथे थांबले आहेत.
 
हे सर्व जवान जेवणाच्या निकृष्ट दर्जाची तक्रार करणाऱ्या सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान तेज बहादूर यांच्या समर्थनार्थ प्रचार करणार आहेत.
 
"आपण एक खरे चौकीदार असून, खोट्या चौकीदाराविरोधात लढत आहोत," असं तेज बहादूर यांनी सांगितलं आहे.