शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (18:13 IST)

नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. नाना पटोले हे साकोली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले आहेत.
 
नाना पटोले यांनी आपला राजीनामा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
 
नाना पटोले यांच्या खांद्यावर राज्य काँग्रेसची महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिली आहे.