नित्यानंद यांचा स्वतंत्र देशाचा दावा, इक्वाडोरमध्ये खरेदी केला भूखंड
स्वयंघोषित आध्यात्मकि गुरू स्वामी नित्यानंद यांनी अमेरिकेतील इक्वाडोरमध्ये खासगी भूखंड खरेदी केला आहे. 'कैलास' असं या भूखंडाचं नाव ठेवण्यात आलं आहे. नित्यानंद यांनी या भूखंडाला 'हिंदूराष्ट्र' म्हटलंय.
'महान हिंदूराष्ट्र कैलास'साठी देणग्यांचं आवाहनही नित्यानंद यांनी वेबसाईटवरून केलंय. हा स्वतंत्र देश असल्याचा दावाही नित्यानंद यांनी केला आहे.
लहान मुलांचं अपहरण करून त्यांच्या माध्यमातून देणग्या गोळा केल्याप्रकरणी नित्यानंद यांच्याविरूद्ध काही दिवसांपूर्वीच अहमदाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याआधी नित्यानंद यांच्यावर कर्नाटकमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नित्यानंद यांना अटक करण्याआधीच ते देश सोडून पसार झाले. गुजरातमधील अहमदाबाद येथे नित्यानंद यांचा आश्रम आहे.