सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 3 डिसेंबर 2019 (15:16 IST)

2024 पर्यंत देशभरात NRC लागू करणार - अमित शाह

राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत देशभरात लागू करणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी झारखंडमधील प्रचारादरम्यान दिली.  
 
"राहुल गांधी म्हणतात घुसखोरांना काढू नका. ते कुठे जाणार, काय खाणार? पण मी तुम्हाला आश्वासन देतो, 2024 पर्यंत सर्व घुसखोरांना बाहेर काढणार आहे," असं अमित शाह यांनी म्हटलं.
 
"पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीआधी प्रत्येक घुसरखोराची ओळख पटवून त्याची हकालपट्टी करू," असं अमित शाह यांनी म्हटलं. मात्र, पश्चिम बंगालमधील भाजपचेच काही नेते एनआरसीशी सहमत नसल्याची चर्चा आहे. कारण प. बंगालमधील पोटनिवडणुकीत या मुद्द्याचा पक्षाला फटका बसला होता.