ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्तींवर PSA अन्वये गुन्हा
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांच्यावक सार्वजनिक सुरक्षा कायद्यान्वये (PSA) गुन्हा दाखल करण्यात आलाय.
कोणत्याही ट्रायलशिवाय तीन महिने कोठडी देण्याची तरतूद PSA कायद्यात आहेत. याआधी ओमर अब्दुल्ला यांचे वडील आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनाही याच कायद्याखाली कैद करण्यात आलीय.
अब्दुल्ला आणि मुफ्तींसह आणखी तीन नेत्यांविरोधात PSA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. यात मोहम्मद सागर, बशीर अहमद विरी आणि सरताज मदनी यांचा समावेश आहे.
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं 370 कलम रद्द करण्यात आल्यानंतर ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला यांसह अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलंय.