बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 5 फेब्रुवारी 2020 (13:35 IST)

विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे प्रशिक्षण आता 'यशदा'मध्येच

विद्यापीठ आणि महाविद्यालयीत प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक, प्राचार्य, कर्मचारी यांना पुण्यातील यशदा किंवा अध्यापक विकास संस्थेतच प्रशिक्षण देण्यात यावेत, दसे आदेश उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले.  
 
यशदा ही राज्य सरकारची प्रशासकीय प्रशिक्षण संस्था आहे. तर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील आधुनिक शिक्षण पद्धतीतले बदल लक्षात घेऊन सरकारनं अध्यापक विकास संस्था स्थापन केली. या दोन संस्था वगळता कुठल्याही खासगी संस्थेत प्रशिक्षण दिले जाऊ नये, असे आदेश मंत्र्यांनी दिलेत.
 
विद्यापीठ आणि महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचाऱ्यांना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत प्रशिक्षण देत असल्यावरुन काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.