रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 एप्रिल 2019 (08:24 IST)

काँग्रेस म्हणजे ब्रिटिशांची औलाद, तर राष्ट्रवादी म्हणजे काँग्रेसचं पिल्लू : पंकजा मुंडे

काँग्रेसवाले ब्रिटिशांची औलाद आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस हे काँग्रेसचं पिल्लू आहे, अशी टीका महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे.  
 
नांदेडमधल्या मुखेडच्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या.
 
त्या म्हणाल्या, "काँग्रेसवाले म्हणजे ब्रिटिशांची औलाद आहे. यांनी ब्रिटिशांप्रमाणे देशात फोडा आणि राज्य करा ही पॉलिसी राबवली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे त्याच काँग्रेसचे पिल्लू आहे. ब्रिटीश भारतात व्यवसाय करण्यासाठी आले होते. व्यवसाय करता-करता त्यांनी 150 वर्षं भारतावर सत्ता गाजवली. त्यानंतर काँग्रेसवाल्यांनी सत्तेमध्ये व्यवसाय केला, त्यामुळे लोकांचा काँग्रेसवरचा विश्वास उडाला आहे."
 
दरम्यान, बीडमध्ये शिवसंग्राम पक्ष राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा प्रचार करेल, असं पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी जाहीर केलं आहे. विनायक मेटे सध्या भाजपसोबत आहे.
 
त्यांची ही घोषणा पंकजा मुंडे यांच्यासाठी राजकीय धक्का मानली जात आहे.