मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 11 एप्रिल 2019 (19:43 IST)

राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर लेझर लाईट

loksabha elections
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठी लोकसभा मतदारसंघात बुधवारी रोड शो झाला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर लेझर लाईट मारण्यात आल्याचे समोर आले आहे. काँग्रेस पक्षाने याची गंभीर दखल घेत पत्र पाठवून हा प्रकार केंद्रीय गृहमंत्रालयाला कळवला आहे. या पत्रावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, जयराम रमेश आणि रणदीप सुरजेवाला यांची स्वाक्षरी होती. राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर मारण्यात आलेली लेझर स्नायपर रायफलची असण्याची शक्यता होती. जवळपास सातवेळा राहुल यांच्या डोक्यावर हिरव्या रंगाची लेझर लाईट दिसून आली. ही सुरक्षाव्यवस्थेतील गंभीर त्रुटी असल्याचे या पत्रात म्हटले होते.
 
मात्र, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून हे सर्व आक्षेप फेटाळून लावण्यात आले आहेत. राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावरील लेझर लाईटचा प्रकाश हा काँग्रेस कार्यकर्त्याच्या मोबाईलमधून येत होता, असे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले. तसेच काँग्रेसकडून आपल्याला कोणतेही पत्र आले नसल्याचा दावाही गृहमंत्रालयाने केला.