गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019 (09:47 IST)

अयोध्येत गगनाला भिडणारं राम मंदिर बांधणार - अमित शाह

"काँग्रेसनं अयोध्या प्रकरणात अडथळे आणले. मात्र, अयोध्येवर सुप्रीम कोर्टानं ऐतिहासिक निर्णय दिला आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, आता अयोध्येत गगनाला भिडेल असं राम मंदिर बांधण्यात येईल," असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. झारखंडमध्ये ते बोलत होते. 
 
कलम 370विषयी ते म्हणाले, "काँग्रेसनं वोट बँकेसाठी हा मुद्दा 70 वर्षं लटकून ठेवला होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 हा कलंक हटवून काश्मीरच्या विकासाचा मार्ग मोकळा केला. पुन्हा पूर्ण बहुमताचे सरकार येताच पहिल्याच अधिवेशनात कलम 370 आणि 35-A रद्द करण्याचं काम मोदींच्या सरकारनं केलं."
 
दरम्यान, रामजन्मभूमी-बाबरी मशिदी प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर समीक्षा याचिका दाखल न करण्याचा निर्णय मौलाना महमूद मदानी यांच्या नेतृत्वात जमीअत उलेमा-हिंद संघटनेनं घेतला आहे.
 
यावषयी संघटनेनं म्हटलं, "अयोध्येचा निकाल मुक्त भारताच्या इतिहासातील सर्वांत गडद डाग आहे. पण आणखी नुकसान होण्याची शक्यता असल्यानं पुनर्विचार याचिका दाखल करणार नाही."