शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 14 ऑक्टोबर 2019 (12:08 IST)

टीकेची झोड उठल्यावर रवीशंकर यांचं विधान मागे

बॉलिवूड सिनेमांच्या कमाईची तुलना करत भारतीय अर्थव्यवस्थेला कशी मरगळ आलेली नाही, असा दावा करून केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद वादात अडकले. त्यांच्यावर चहुबाजूंनी टीकेचा भडीमार झाला. त्यानंतर त्यांनी आपले विधान मागे घेतले. व्हिडिओतील माझ्या विधानाचा एकच भाग विपर्यास करून दाखवला. तरीही मी हे विधान मागे घेतो, असे त्यांनी जाहीर केले.
 
आपल्या निवेदनात रवीशंकर प्रसाद म्हणाले, "मुंबईत काल मी तीन सिनेमांच्या 120 कोटी रुपयांच्या कमाईबद्दल बोललो. या माहितीत पूर्ण तथ्य आहे. मी मुंबईत होतो, मुंबईला भारतात सिनेमाची राजधानी म्हणतात. मला सिनेमा उद्योगाचा अभिमान आहे. या क्षेत्रात लाखो लोकांना रोजगार मिळतो आणि टॅक्सही मिळतो. मी या सर्वाविषयी विस्तृतपणे बोललो होतो. माझ्या मीडियाशी झालेल्या चर्चेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहे. पण माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला."