बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 18 डिसेंबर 2019 (10:43 IST)

सरकारविरोधात आंदोलनात सहभाग; सुशांत सिंहने गमावलं सूत्रधाराचं काम

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरातून विरोध होत आहे. या कायद्याला विरोध करण्यासाठी मुंबईत झालेल्या आंदोलनात अभिनेता सुशांत सिंह सहभागी झाला होता. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी त्याचं 'सावधान इंडिया' सीरियलच्या निवेदकाचं काम काढून घेण्यात आलं.  
 
माझा सावधान इंडियातील प्रवास आता संपला असं ट्वीट सुशांत सिंहने केलं. यासंदर्भात चॅनेलकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. हा शो स्टार भारतवर दाखवला जात आहे. सत्य बोलण्याची किंमत मोजावी लागली का? या प्रश्नावर सुशांत म्हणतो, "ही तर खूप छोटी किंमत आहे मित्रा. भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांना काय उत्तर द्यायचं?"