1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021 (12:17 IST)

सिद्धार्थ शुक्लाचं मृत्यूचं कारण आज कळण्याची शक्यता कमी

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. त्याच्या मृत्यूचा कारण मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही.
 
सिद्धार्थच्या मृत्यूचं कारण आज अधिकृतपणे पोलिसांकडून सांगितलं जाण्याची शक्यता होती. पण रुग्णालयाच्या सुत्रांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार पोस्ट मॉर्टमचा रिपोर्ट आज येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सिद्धार्थच्या मृत्यूचं कारण कळण्यासाठी आता आणखी वेळ लागणार आहे. दरम्यान त्याच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत.
 
" गुरुवारी साधारण साडेदहाच्या आसपास सिद्धार्थला रुग्णालयात आणण्यात आलं, तेव्हाच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप लगेच सांगता येणार नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच त्याबाबत अधिक माहिती देता येईल," असं कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी बीबीसीला सांगितलं आहे.
 
पण कुटुंबीयांचं म्हणणं आहे की सिद्धार्थला हार्टअटॅक आला होता, असं डॉ. मोहिते यांनी बीबीसीला सांगितलंय.
 
बिग बॉस जिंकल्यानंतर सिद्धार्थ शुक्ला सातत्याने चर्चेत राहिला. काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थ डान्स दिवाने आणि बिग बॉस या दोन रिअॅलिटी शोमध्ये दिसला होता.
 
सिद्धार्थ शुक्ला मुळचा मुंबईचा आहे. गेल्या महिन्यात सिद्धार्थ शुक्लाची ब्रोकन बट ब्यूटिफूल- 3 वेब सीरिज प्रदर्शित झाली होती.
 
बालिका वधू आणि दिल से दिल तक या मालिकांमधून सिद्धार्थ शुक्लाने आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. या दोन्ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरल्या.
 
आलिया भट्ट आणि वरुण धवन यांच्या हम्प्टी शर्मा की दुल्हनीया या सिनेमातही सिद्धार्थ झळकला होता.
 
बीग बॉस 3 मध्ये सिद्धार्थ आणि त्याची मैत्रीण शेहनाझ गिल यांची जोडी सुपरहीट ठरली होती.