मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019 (13:05 IST)

हैदराबादमध्ये पशुवैद्यक तरुणीची हत्या

तेलंगणाची राजधानी हैदराबादजवळील शादनगर भागात एका पशुवैद्यक तरुणीवर अत्याचार केल्यानंतर तिच्या मृतदेहाला आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे.  
 
दुचाकीत बिघाड झाल्यामुळे ही 27 वर्षांची तरुणी तिच्या दुरुस्तीसाठी थांबली होती. बुधवारी रात्री तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचं समोर आलं आहे.
 
पोलिसांच्या मते "रात्री 8च्या सुमारास दवाखाना बंद केल्यानंतर ही तरुणी घराकडे निघाली होती. रस्त्यातच तिची गाडी खराब झाली. त्यामुळे तिनं बहिणीला फोन केला. गाडी टोल नाक्यावर सोड आणि कॅब करून ये, असं बहिणीनं तिला सुचवलं. पण, हे करत असतानाच 2 जणांनी तिची गाडी दुरुस्तीसाठी मदत करू असं सांगितलं.
 
तरुणीनं होकार दिल्यानंतर ते दोघं तिची गाडी दुरुस्तीसाठी घेऊन गेले. त्यानंतर ती गाडी येण्याची वाट पाहत असतानाच काही जणांनी या तरुणीला शेजारच्या निजर्नस्थळी ओढत नेलं. तिथं तिची हत्या केली आणि नंतर तिच्या मृतदेहाला आग लावली." या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.