साहित्य : अळूची पाने, चण्याच्या डाळीचे पीठ, तिखट, मीठ, चिंच, गूळ, धने व जिरे यांची पूड, हिंग, तीळ, फोडणीचे साहित्य.
कृती : चण्याच्या पिठात चिंचेचे पाणी, गूळ, तिखट, मीठ, धण्याजिऱ्याची पूड़ व हिंगाची पूड घालून पीठ कालवावे. नंतर अळूच्या पानाच्या पालथ्या बाजूवर पीठ पातळसर लावावे. त्याच्यावर दुसरे पान ठेवून त्याला पीठ लावावे. याप्रमाणे एकावर एक अशी चार पाने ठेवावी व पानांची बळकटी करून ती वाफवून घ्यावी व काप करावेत. फोडणीत तीळ घालून त्यात हे काप परतून काढावेत.