शनिवार, 7 फेब्रुवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. बंगाली 'मिष्टी' स्वाद
Written By वेबदुनिया|

आलूर पोटोलेर दालना

(भाज्यांची आमटी-बंगाली पद्धत)

बटाटे पाणी धणे पूड परवर
ND
साहित्य : 4 बटाटे सोलून तुकडे केलेले, सवा कप पाणी, 3 मोठे चमचे धणे पूड, 2 मोठे चमचे जिरे पूड, 10 ग्रॅम आले, सवा किलो परवर सोलून कापलेले, 2 तमालपत्रे, दीड छोटा चमचा हळद पूड, 3 1/2 चमचा लाल मिरची पूड, 1 छोटा चमचा गरम मसाला पूड, 3 1/2 छोटे चमचे मीठ, 1 मोठा चमचा साखर, 1 मोठा चमचा तूप.

कृती : धणे पूड आणि जिरे पूड या मध्ये 1/4 पाणी थोडे थोडे घालत मऊ मिश्रण तयार करा. आल्याचे वाटण करा. परवराचे दोन भाग करा. कुकरमध्ये तेल साधारण 5 मिनिटे गरम करा. प्रत्येक भाग हलवा परतून घ्या आणि काढा. त्याच तेलात बटाटे हलके परतून काढून घ्या कुकरमध्ये उरलेल्या तेलात तमाल पत्र घाला. काही सेकंद ढवळा. धण-जिर्‍याचे आणि आल्याचे वाट, हळद पूड, मिरची पूड आणि गरम मसाला पूड घाला. ढवळा आणि साधारण 1 मिनिट परता. परवर, बटाटे, मीठ साखर आणि उरलेले पाणि घाला. चांगले ढवळा. व 5 मिनिट शिजवा. नंतर परवर करीवर तूप एकसमान सोडा. गरम गरम वाढा.