बुधवार, 7 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. बंगाली 'मिष्टी' स्वाद
Written By वेबदुनिया|

चणा - बटाटा चाट

चणा बटाटा चाट पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : 2 कप उकळलेले बटाटे, 1 कप उकळलेले हिरवे चणे, 1/2 बारीक चिरलेला कांदा, 1 कप डाळिंबाचे दाणे, बारीक चिरलेली कैरी 1/2 कप, किसलेले नारळ 1/2 कप, पाव कप बारीक चिरलेले पुदिनाची पानं, पाव कप चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे जिरे पूड, 2 चमचे चाट मसाला, मीठ व साखर चवीनुसार.

फोडणीसाठी साहित्य : 1 चमचा तेल, 2 चमचे मिरची पेस्ट.

कृती : चाटचे सर्व साहित्य एकजीव करावे. तेल गरम करून त्यात मिरचीचे पेस्ट घालून थोडे परतून घ्यावे व चाटमध्ये मिक्स करावे. मुलं आणि मोठ्यांना ही आंबट गोड चाट फारच आवडेल.