1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. बंगाली 'मिष्टी' स्वाद
Written By वेबदुनिया|

दुधीभोपळ्याची रबडी

दुधीभोपळ्याची रबडी पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : 200 ग्रॅम दुधी भोपळा, 3 कप दूध, 1/2 डबा कंडेन्स्ड मिल्क, 25 ग्रॅम काजू, 2 चमचे तूप, 1/4 चमचा इसेन्स, 1/2 वेलदोड्याची पूड, 4 ब्रेडचे स्लाइस.

कृती : थोड्या तुपावर किसलेला दुधी भोपळा परतून घ्यावा. दुधात पाणी न टाकता त्यातच दुधी भोपळा शिजवावा. थोड्या दुधात ब्रेडचे स्लाइस भिजत घालावे. नंतर मिक्सरमधून काढावे. थोडे दूध कंडेन्स्ड मिल्कमध्ये मिसळून घ्यावे. नंतर शिजलेल्या दुध्यावर ओतून सारखे करावे. त्यात ब्रेड घातलेले दूध घालावे. वेलदोड्याची पूड व इसेन्स घालून जरा ढवळावे व गॅसवरून उतरवावे. मिश्रण कोमट झाले, की फ्रीजमध्ये ठेवावे. सर्व्ह करताना वरून काजूचे काप घालून सजवावे.