साहित्य : 1 कप भात, 1/4 कप मटर उकळलेले, 1 मोठा चमचा काजू व मनुका, 1/4 कप कांदे बारीक कापलेले, कोथिंबीर चिरलेली, 2-3 हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा चाट मसाला, मीठ चवीनुसार, तेल तळण्यासाठी.
कृती : थंड भातात कोथिंबीर व हिरव्या मिरच्या घालून चांगले कुस्करून घ्यावे. उकळलेल्या मटरमध्ये चाट मसाला, कांदा, काजू व मनुका घालून चांगले एकजीव करून घ्यावे. या मिश्रणाला भातात कालवून वडे तळून घ्यावे. सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करावे.