साहित्य : दोन दिवसांचे शिळे रसगुल्ले, केशर किंवा केशरी रंग, संत्र्याचा इसेन्स.
कृती : रसगुल्ल्याच्या पाकात केशर किंवा केशरी रंग घालावा. नंतर पाकात रसगुल्ले घेऊन, पाक उकळून, एकतारी होऊ द्यावा. भांडे नंतर खाली उतरवून पाक गार झाल्यावर त्यात संत्र्याचा इसेन्स घालावा.