स्वप्नाकडून सत्यापर्यंत (लेह लद्दाख बुलेट प्रवास)

leh laddhak
Last Updated: सोमवार, 8 डिसेंबर 2014 (15:04 IST)
- योगेश अरविंद अनासपुरे

माझं हे प्रवासवर्णन आहे अगदी साधं! यात शब्दांच्या चमत्कृती नाहीत की सराईत कोलांट्याउड्या नाहीत! आहेत ते प्रवासात मनामधे
आलेले, छोट्याश्या डायरीत त्याचवेळी टिपलेले आणि हा ब्लॉग लिहिताना सरळपणे मांडलेले विचार!

प्रवासवर्णनं संयत असावी लागतात कारण अनाठायी तपशिलांमुळे ती शब्दबंबाळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे मीही अनावश्यक वर्णनं
वगळून किमान वेळात वाचून होईल असं सुटसुटीत प्रवासवर्णन लिहिलंय. हे वाचून जर कोणाला हा जादूई प्रवास करावासा वाटला तर माझीउठाठेव सफळ होईल.
प्रत्येकानंच मनाशी जसं अगदी स्वतःचं असं एखादं स्वप्न बाळगलेलं असतं, तसंच माझंही एक स्वप्न होतं...एखाद्या अद्भुत-अनोख्या
प्रवासाचं! मात्र हे स्वप्न वास्तव झाल्याचं पहाण्यासाठी एखादी जादूची कांडी फिरावी अशीही माझी अवास्तव मागणी कधीही नव्हती.
त्यासाठी हवा तेवढा घाम गाळायला मी राजी होतो. त्याचा पाठपुरावा करण्याचं धैर्यही मी उराशी बाळगलेलं होतंच. डॉ. ए. पी. जे. अब्दुलकलामांचं या संबंधी फार छान वाक्य आहेः You have to dream before your dreams can come true. मला हेही चांगलंच ठाऊक
होतं की माझं स्वप्न जर मला साकार करायचं असेल तर केवळ कृती करुन चालणार नाही तर मला ते साकार झाल्याच्या स्वप्नावरही
कमालीचा विश्वास ठेवावा लागणार आहे. म्हणजे मग ती सकारात्मक ऊर्जाच मला प्रत्यक्षात सहाय्य करण्यासाठी धाऊन येईल. असं
म्हणतात की जग हे एक उघडं पुस्तक आहे आणि जो प्रवास करत नाही तो त्या पुस्तकाचं केवळ एकच पान वाचतो. प्रवास करणं म्हणजेस्वतःचा नव्यानं शोध घेणं असतं...प्रवास करणं म्हणजे स्वतःच्याच अंतरंगात फेरफटका मारुन येण्यासारखं असतं. यावर्षी
कैलास-मानससरोवर मनात ठरवलं होतं. पण काही कारणामुळे ते होऊ शकलं नाही.
> प्रवासाचा पहिला नियम आहे - ज्यांच्याशी आपलं पटू शकत नाही अश्यांसोबत कधीही प्रवासाला न जाणं! पत्नी-मुलाबाळं-इष्ट-मित्रांसोबत
प्रवास करावा...कारण यापूर्वी कधीही न जाणवलेला त्यांच्या स्वभावाचा एखादा अनोखा पैलू प्रवासात लख्खपणे चमकून जातो. त्यामुळेचमेहुणा रोहित कुलकर्णी आणि मित्र निलेश वैकर, आशुतोष मुळे, चारुदत्त जोशी आणि केदार बोबडे यांच्यासोबत मनाली-लेह-काश्मिर असा
अद्भुत प्रवास बुलेट्सवरुन करायचं मी ठरवलं. पत्नी अनघा आणि आई-बाबांनी लागलीच परवानगी दिल्यामुळे हुरूप आला.> मुख्य अडचण होती ती व्यावसायिक कामांतून १५ दिवस सुट्टी काढण्याची आणि बुलेट मिळवण्याची! माझ्यापुरतं बोलायचं झालं तर,प्रवासच मला पोटापाण्यासाठी माझा व्यवसाय करायला आणि रोजचं जगणं आनंदात जगायला प्रोत्साहन देत असतो. प्रवासावर माझं
निरतिशय प्रेम असल्यानं कदाचित् असेल पण माझ्या या दोन्हीही अडचणी चुटकीसरशी दूर झाल्या. बालमित्र भूषण भणगेनं क्षणार्धात्
त्याच्या बुलेटची किल्ली माझ्या हातात सोपावली आणि व्यवसायात मार्गदर्शक असलेले माझे काका श्री. सुधीर जोशींनीही लागलीच प्रवासाचं
बुकींग करुन टाकायला सांगितलं. प्रवासाला जाण्यापूर्वी माझे व्यावसायिक भागिदार आणि मित्र श्री. मंगेश मिरीकरांनी पाठीवर आश्वासक
हात फिरवत म्हटलं, "योगेश बिनधास्त जाऊन ये! इथलं सगळं सांभाळायला मी आहे!
काही काळजी करु नकोस!"


प्रवासाला निघण्याआधीच ‘प्रवासी’ व्हायचंय का ‘टूरीस्ट’ व्हायचंय हेदेखील ज्यानंत्यानं आपापल्या 'तब्येतीनुसार' ठरवावं! कारण दोघांच्याही'पहाण्यात' कमालीचं अंतर असतं...प्रवाश्याला 'न दिसणारंही' खुणावत असतं तर टूरीस्ट जे 'पहायला' आलेला असतो, तेच केवळ त्याला
'दिसत' असतं. प्रवासात केवळ 'स्मृती' हीच ती काय एकमेव बॅग पाठीवर टाका…अनावश्यक काहीही सोबत घेऊ नका.


आम्ही 'एसपीआर-गिरिरत्न हायकर्स' या संस्थेमार्फत बुकींग करुन टाकलं आणि मग तयारीला वेग आला. 'हे लागेल - ते लागेल' असंकरताकरता ही भलीमोठी सॅक भरली. त्यात खाण्याच्या टिकाऊ पदार्थांपासून गरम कपडे-कॅमेरा-बुलेटचे आवश्यक सुटे भाग होते. प्रवासात
एकूण १६ जण राईडर्स, ५ जण पिलियन राईडर्स आणि कारमधून प्रवास करणारे ७ जण असा २८ जणांचा ग्रुप तयार झाला. मुंबईहून
रेल्वेनं चंदीगडला पोहोचल्यावर ख-या अर्थानं प्रवास सुरु झाला. चंदीगडमधे ज्या हॉटेलमधे उतरण्याची सोय केलेली होती, तिथे आम्हीपोहोचण्याआधीच आमच्या बुलेट्स आमची वाट पहात उभ्या होत्या. त्यांच्याकडे पहाताना मनात येऊन गेलं, 'आता इथून पुढे १०-१२ दिवस
या बुलेट्सच आपलं सर्वस्व आहेत...आपल्यासाठी ईश्वराचं रुप आहेत...!' मनोमनच त्यांना सॅल्यूट ठोकून घेतला. अश्या 'हाय अल्टिट्यूड'
प्रवासातील सर्वात महत्त्वाची काळजी घेणं म्हणजे भरपूर पाणी पिणं आणि मांसाहार-मद्यपान पूर्ण वर्ज्य!

दुस-या दिवशी सकल शुभकार्याचा सिद्धीदाता श्रीगणेश आणि स्मरणगामी श्रीदत्तप्रभू यांचं स्मरण करुन मनालीच्या दिशेनं बुलेट्ला किक्
मारली. अज्ञाताविषयी भीति, हुरहूर, धाकधूक वाटणं हा मानवी स्वभाव आहे. त्याचाच अनुभव पहिल्या दिवशी येत होता. आभाळ आलेलं
होतं, भुरभुर पाऊसही पडत होता. भोवतालच्या शेतांचा हिरवाकंच रंग क्षितिजापर्यंत पसरलेला होता. वर काळेकुळकूळीत ढग, त्यातून पडतअसलेले पावसाचे रुपेरी थेंब आणि आजूबाजूची ती हिरवाई हे सगळंच दैवी होतं.


वाटेत प्रथम पाहिला तो बियास नदीवर १९७७ साली उभारलेला ‘पंडोह डॅम’! इथे जलविद्युत निर्मिती केंद्र आहे. रात्री मनाली मुक्कामी
पोहोचलो. दुसरा दिवसही आम्ही मनालीतच होतो. गाड्यांची देखभाल, पेट्रोल भरणं, काही किरकोळ खरेदी यात तो दिवसही चटकन
मावळला.

पुढच्या दिवसापासून रोहतांगपास-राणी नल्ला-टांगलांगला अश्या आमच्या खडतर प्रवासाला सुरुवात झाली. मनालीहून रोहतांगपास पार
करताना प्रवासात धुकं-पाऊस-ग्लेसियर्सचं वितळलेलं पाणी-ट्रॅफिक् अशी सत्राशेसाठ विघ्नं येऊ शकतात. परंतु सुदैवानं तसं काहीही न होता
आमचा तोही टप्पा निर्विघ्नपणे पार पडला. एका बाजूला पांढ-या शुभ्र हिमानं झाकलेले उंच पर्वत आणि दुसरीकडे काळजाचा ठोकाचुकवणारी खोल दरी अशी निसर्गाची दोन्हीही रुपं आम्ही पहात होतो.

मौजेची गोष्ट अशी की वाटेत ‘तंडी’ या गावात आमचं स्वागत केलं ते 'चंद्रभागा' नदीनं! त्या नदीचं नाव ऐकताक्षणीच आमचं मराठी मन
केंव्हाच पंढरपुरात सावळ्या विठोबाच्या समचरणी जाऊन पोहोचलं होतं. तंडीमधे भेटलेली ही चंद्रभागा नदी 'चंद्र' आणि 'भागा' या दोन
नद्यांच्या संगमानं निर्माण झालीये. आणि तिलाच पुढे 'चिनाब' या नावानं ओळखतात. (या तंडी गावानंतर पुढे ३०० किमी अंतरापर्यंतपेट्रोलपंप नाही, हे लक्षात असू द्यावं.) त्या रात्रीचा मुक्काम होता निसर्गानं फार जिव्हाळ्यानं घट्ट मिठी मारलेल्या ‘केलांग’ या चिमुकल्या
गावात! या गावात वास्तव्यासाठी आटोपशीर आणि स्वच्छ अशी गेस्ट हाऊसेस् उपलब्ध आहेत.


सकाळी जाग येताच नजर खिडकीबाहेर गेली. क्षितिजावर अर्धवर्तुळाकार इंद्रधनुष्य होतं. त्या परिसराचं वातावरणच प्रदुषणमुक्त असल्यानंइंद्रधनुष्याचे सगळेच रंग अनाघ्रात फुलासारखे तजेलदार दिसत होते. काही वेळानं पुढचा प्रवास सुरु झाला समुद्रसपाटीपासून १४००० फूट
उंचीवर असलेल्या 'सारचू' या ठिकाणाच्या दिशेनं! कठीण परीक्षा देतदेतच दुपारी जेवणाच्या वेळेपर्यंत आम्ही तिथे पोहोचलो. या
ठिकाणापासून निसर्गात बदल व्हायला लागतो. त्यामुळेच आमच्यातल्या बहुतेकजणांना डोकेदुखी-श्वसनाचा त्रास व्हायला लागला होता. कापूरहुंगणं, लसूण खाणं, लसणाचं पाणी पिणं यासारखे आमचे 'आजीबाईच्या बटव्यातले' उपाय चालू होतेच.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका
महाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...

पुन्हा घडणार रामायण

पुन्हा घडणार रामायण
पुन्हा घडणार रामायण

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत
करोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील प्रत्येक जण शक्य तितके प्रयत्न करत आहेत. ...