1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: मंगळवार, 19 एप्रिल 2022 (09:19 IST)

उज्जैनचे श्री चिंतामण गणेश मंदिर

chintaman ganesh ujjain
गणपतीचे हे मंदिर क्षिप्रा नदीजवळ फतेहाबाद रेल्वे लाइनवर स्थित आहे. या मंदिरात प्रतिष्ठित गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी-सिद्धी विराजमान आहेत. 

चिंतामण अर्थात चिंता दूर करणारा, अशी श्रद्धा आहे की येथे दर्शन घेतल्याने सर्व काळजी दूर होते. येथील विशेष बाब म्हणजे हे देव फोनवरदेखील भक्तांची इच्छा पूर्ण करतात. आपल्या आश्चर्य वाटेल पण जगभरातील येथे आपली मनोकामना पूर्ण होऊ इच्छित लोकं फोन करतात.
 
येथील पुजारी भक्तांचा मोबाइल आल्यावर गणपतीच्या कानावर लावतात. भक्त आपली अडचण देवाच्या कानात सांगतात आणि देव त्यांची मनोकामना पूर्ण करतो असे अनेक भक्तांचे म्हणणे आहे.
 
लोकं येथे चांगली नोकरी, प्रमोशन, विवाह आणि सुख समुद्धीसाठी नवस करतात आणि गणपती त्यांना कधीच निराश करत नाही.