शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By

सोलो ट्रॅव्हलला जाताय...।।

सोलो ट्रॅव्हलिंगचा ट्रेंड जोरात आहे. मुली आणि महिला ही हल्ली सोलो ट्रिप करतात. एकटीने  फिरायचं म्हणजे सुरक्षेची जरा जास्तच काळजी घ्यावी लागते. थोड्याश्या दुर्लक्षामुळे बरचं नुकसान होऊ शकतं. सध्या भटकंतीचे दिवस आहेत. तुम्हीही एकटीनं फिरायचं धाडस करण्याच्या विचारात असाल तर यावेळी कोणती काळजी घ्यायला हवी, याविषयी.... 
 
* फिरायचं ठिकाण ठरल्यानंतर हॉटेल बुकिंग करताना सावध रहा. या ठिकाणाला भेट देणारे नातेवाईक, मित्र यांच्याकडून माहिती घ्या. सुरक्षित हॉटेलची निवड करा. 
 
* तुम्ही ज्या ठिकाणी फिरायला जाताय तिथे आधी कुणी गेलं नसेल किंवा माहिती विचारायला वेळ नसेल तर ऑनलाईन सर्च करा. संबंधित हॉटेलविषयी लिहिलेली मतं वाचा. अशी माहिती नसेल तर त्या ठिकाणी राहू नका. 
 
* तुम्ही ज्या खोलीत राहताय ती खोली आतून नीट बंद होते ना हे तपासून घ्या. तुमच्या सोबत डोअर स्टॉपर ठेवा. 
 
* रात्रीचा आणि पहाटेचा प्रवास टाळा. गर्दीच्या वेळची तिकिटं बुक करा. विमान, बस, ट्रेनची तिकिटं बुक करताना वेळा तपासून घ्या. बॅग्ज नीट लॉक करून ठेवा. रात्रीच्या प्रवासादरम्यान विशेष काळजी घ्या. 
 
* एखाद्या रात्री हॉटेलमध्ये राहणार नसाल तर हॉटेल कर्मचार्‍यांना याबाबत सांगू नका. तुमच्या खोलीत चोरी होऊ शकते. 
 
* फोनची बॅटरी संपणार नाही याची काळजी घ्या. स्थानिक मिस कार्ड घालून घ्या. डेटा पॅक ऑन ठेवा. दोन बॅटर्‍या सोबत ठेवा. ऑनलाईन कनेक्ट राहा. रस्ता विसरला तर नेव्हिगेशनचा वापर करता येईल. 
 
* अनोळखी व्यक्तीशी बोलू नका. अशा लोकांना टाळा, दुर्लक्ष करा. कुणी पाठलाग करत असेल तर पोलिसांना माहिती द्या. 
 
* एजंटकडून बुकिंग करत असाल तर सिंगल बर्थची मागणी करा. यामुळे पुरुष प्रवाशासोबत बर्थ शेअर करावं लागणार नाही.