रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

आई होणार आहे करिना कपूर

गेल्या काही दिवसांपूर्वी एका एंटरटेन्मेंट पोर्टलने दावा केला होता, की अभिनेत्री करिना कपूर साडेतीन महिन्यांची प्रेगनेंट आहे. अलीकडेच युनिसेङ्खच्या एका इव्हेंटमध्ये करिना कपूरने बेबी बम्प लपवण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोर्टलच्या या बातमीची चर्चा वाढली आहे. इव्हेंटमध्ये करिनाच्या चेहर्‍यावर ग्लो दिसला आणि तिचे बेबी बम्प स्पष्ट दिसून आले. सैङ्ख आणि करिना नुकतेच लंडनहून सुटी एन्जॉय करून परतले आहेत. 
 
अद्याप सैफ किंवा करिनाने प्रेगनेंटसीविषयी काहीच सांगितले नाहीये. त्यांच्या कुटुंबीयांनीसुध्दा याचा काहीच खुलासा केला नाहीये. करिनाने युनिसेफच्या इव्हेंटमध्ये पोटावर हात ठेवून पोट लपवण्याचा प्रयत्न केल्यानंतर ती खरंच प्रेगनेंट आहे का? असे प्रश्न उपस्थित व्हायला लागले आहेत. कार्यक्रमात मुलांसोबत टिस्टर खेळताना करिना अनकम्फर्टेबलसुध्दा दिसली. शिवाय ती पोडियमकडे जात असताना तिने हाताने बेबी बम्प लपवले. 
 
सध्या करिना ‘उडता पंजाब’ सिनेमात बिझी आहे. हा सिनेमा 17 जूनला रिलीज होतोय. सैफ अली खानने 16 ऑक्टोबर 2012 मध्ये स्वत:पेक्षा 10 वर्षे लहान करिना कपूरसोबत दुसरे लग्न केले. त्याची पहिली पत्नी अमृता सिंग होती.