रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By मनोज पोलादे|

तनूश्री दत्ताने दिले शाप

'गुड बॉय, बॅड बॉय' च्या चित्रीकरणादरम्यान इमरान हाशमी व तुषार कपूरने तनुश्री दत्ताची चांगलीच फिरकी घेतली. तनुश्री दिसताच दोघेही हसत सुटायचे. तनुश्री वैतागून आपला लूक, मेकअप बघायची. शेवटी तिला दोघे फिरकी घेताहेत हे कळले तेव्हा तिने कृतककोपाने इमरानला शाप दिला तुझ्या पुढच्या चित्रपटात चुंबनदृश्य नसेल आणि तुषार कपूरला शाप दिला, तुला तुझ्या बहिणीव्यतिरिक्त इतर कुणाचेच चित्रपट मिळणार नाहीत. आता पाहूया तनूश्रीचे शाप खरे ठरतात का.