शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

नेमार आणि दीपिकाचं कनेक्शन काय?

ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचं काय कनेक्शन असू शकतं? फार विचार करु नका, कारण या दोघांमध्ये काही सुरु नाही. ज्या सिनेमातून दीपिका हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे, त्या ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न ऑफ झँडर केज’मध्ये नेमारही दिसणार आहे.
 
दीपिकाच्या या हॉलिवूड सिनेमात नेमारची छोटी मात्र महत्त्वपूर्ण भूमिका आहे. चित्रपटात नेमारचा कॅमियो आहे. विशेष म्हणजे दीपिका नेमारसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न ऑफ झँडर केज’चं शूटिंग संपवून नुकतीच भारतात परतली आहे. या सिनेमात दीपिकासोबत विन डिजल दिसणार आहे. जगातील बेस्ट स्ट्रायकर म्हणून नेमारची ओळख आहे. 
 
आता अभिनयाच्या पीचवरही त्याने कौशल्य दाखवण्याचा विचार केला. सेटवर नेमारला पाहून सर्वच जण एक्साईट झाले होते. विन डिझेल आणि दीपिका नेमारसह अनेक दृश्यांमध्ये दिसणार आहे.