'फोबिया' उत्कृष्ट अभिनय आणि रोमांचक अनुभव
एखाद्या व्यक्तीला होणार्या घटनांबाबत भास होऊ शकतात का? या विषयावर विज्ञान क्षेत्रात नेहमीच चर्चा होत असते. यावर हॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट बनले आहेत. बॉलिवूडमध्ये तसा हा प्रयोग कमीच झाला आहे. दिग्दर्शक पवन कृपलानी यांनी याच विषयावर सायको थ्रिलर 'फोबिया' हा चित्रपट बनविला आहे. हे कथानक आहे मुंबईत राहणार्या महकचे (राधिका आपटे) एका घटनेनंतर ती गराच्या बाहेर निघणेच बंद करून टाकते. बाहेरच्या जगाबद्दल तिली भीती वाटू लागते. महकला ऐका नव्या घरात हलविले जाते. तिथे तिल अशा काही घटनांचा आभास होऊ लागतो ज्याबाबत वास्तव कोणालाच माहीत नाही. कथाककाच्या निर्णायक क्षणी आभास वाटणार्या या घटनांचे सत्यही समोर येते.